मेघमल्हार सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित, घणसोली
"आपली सोसायटी, आपली जबाबदारी" पॅनल
श्री. तुषार केशव नाईक
पारदर्शक कारभार | जबाबदार नेतृत्व | पॅनल प्रमुख

सन्माननीय सभासद बंधू-भगिनींनो, मेघमल्हार सहकारी गृहनिर्माण संस्था, घणसोली यांची पंचवार्षिक निवडणूक 2025-2030, रविवार, दि. ११ मे २०२५ रोजी पार पडत आहे.

कुशल प्रशासन आणि सभासदांच्या सर्वांगीण कल्याणाच्या उद्देशाने आम्ही "आपली सोसायटी, आपली जबाबदारी" या पॅनलमधून श्री. तुषार नाईक यांच्या नेतृत्वाखाली निवडणुकीला सामोरे जात आहोत.

आपल्या अमूल्य मताने आमच्या पॅनलमधील सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमतांनी विजयी करा.

आपला विश्वास – आमची जबाबदारी!

मेघमल्हार सोसायटीचा सर्वांगीण विकास, हाच आपला ध्यास,
धरू सुसंस्कृत उमेदवारांचे हात, देऊ विधायक विचारांस साथ.
पारदर्शकता, जबाबदारी, हाच आमचा मंत्र,

"आपली सोसायटी, आपली जबाबदारी" हा पॅनल केवळ एक निवडणूक पॅनल नाही, तर ही एक विचारधारा आहे – एक अशी चळवळ जी प्रत्येक सदस्याच्या सहभागातून सोसायटीच्या सर्वांगीण विकासाकडे वाटचाल करते. आमचा विश्वास आहे की सोसायटीच्या प्रत्येक घटकाला सन्मान, सुरक्षा आणि सुविधा मिळाल्या पाहिजेत.

पारदर्शक प्रशासन, वेळेवर सेवा, जबाबदार आर्थिक व्यवहार आणि प्रत्येक समस्येला तातडीने उत्तर देणं – हीच आमची कार्यपद्धती आहे. आम्ही केवळ आश्वासने देत नाही, तर ती प्रत्यक्षात उतरवतो. महिलांचा सन्मान, ज्येष्ठ नागरिकांची काळजी, मुलांसाठी सुरक्षित आणि आनंददायक वातावरण, तसेच युवकांसाठी प्रेरणादायी उपक्रम – हे आमचे प्राधान्यक्रम आहेत.

"आपली सोसायटी, आपली जबाबदारी" पॅनल निवडा – कारण एकत्र आल्यानेच विकासाची खरी सुरुवात होते. आता वेळ आहे योग्य नेतृत्व निवडण्याची.

आपलं एक मत, सोसायटीसाठी उज्वल भविष्यासाठी ठरेल निर्णायक!

बदल हवाच आहे... आणि तो आपणच घडवणार – "आपली सोसायटी, आपली जबाबदारी"

पॅनलचे मुख्य उद्दिष्ट
  • पारदर्शक कारभार सुनिश्चित करणे, सोसायटीच्या खर्चांची पारदर्शक माहिती सर्व सभासदांना उपलब्ध करून देणे
  • सभासदाच्या हक्कांचं रक्षण व निर्णय प्रक्रियेत लोकसहभाग वाढवणे
  • सुव्यवस्थित सुविधा, देखभाल व स्वच्छता कायम राखणे
  • महिलांसाठी, वृद्धांसाठी आणि लहान मुलांसाठी सुरक्षित व अनुकूल वातावरण निर्माण करणे
  • नियमित सभा व संवादाच्या माध्यमातून सदस्यांशी थेट संवाद साधणे
  • हरित व पर्यावरणपूरक उपक्रम राबवणे – वृक्षारोपण, पाण्याची बचत, कचरा व्यवस्थापन
  • सांस्कृतिक, सामाजिक व क्रीडा उपक्रमांचे योग्य आयोजन
  • संपत्तीचे व सार्वजनिक जागांचे योग्य व न्याय्य व्यवस्थापन
  • नवीन तंत्रज्ञानाचा वापर – स्मार्ट मीटर, सभा नोटिस ,भरणा, तक्रारी इ.
  • वायफाय झोन किंवा डिजिटल कनेक्टिव्हिटीसाठी उपाय योजना
  • फायर सेफ्टी आणि आपत्कालीन प्रशिक्षण शिबिरे
  • सभासद व कर्मचाऱ्यांसाठी नियमित आरोग्य शिबिरांचे आयोजन
मुख्य मुद्दे व आश्वासने
  • कचऱ्याचे आणि एसीमधून पडणाऱ्या पाण्याचे ड्रेनेज नियोजन
  • सुगम कार, टू-व्हीलर आणि सायकल पार्किंग व्यवस्था
  • पाणी टंचाई प्रश्न सोडवण्यासाठी उपाय
  • सोलर सिस्टमची अंमलबजावणी, संकुलामध्ये वीज बचतीच्या योजना
  • सुरक्षा रक्षक व्यवस्था मजबूत करणे, संकुलाभोवती सुरक्षित कुंपण
  • इमारतीचे नियमित देखभाल व रंगकाम, स्वच्छता
  • इमारतीच्या पाणी टाकीला फिल्टर बसवून पिण्याचे पाणी शुद्ध करणे
  • इमारतीच्या टेरेसला पत्राच्या शेडचे नियोजन
  • लिफ्ट व कॉमन गोष्टींच्या सुविधांची दुरुस्ती वेळेत करणे
  • बोरवेल काढून गार्डनसाठी पाणी नियोजन आणि ओपन जिमची सुविधा
  • संकुलामध्ये पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, कार वॉशसाठी पाण्याची व्यवस्था
  • आपत्कालीन परिस्थितीसाठी जलद अ‍ॅम्ब्युलन्स आणि पोलिस यंत्रणा
नवे नेतृत्व, नवी दिशा
विश्वास ठेवा नव्या विचारांवर, मतदान करा कपबशी चिन्हावर...
जेथे तुमचं मत म्हणजे तुमचा आवाज, आणि तुमचा आवाज म्हणजे आमचं कर्तव्य!
"आपली सोसायटी, आपली जबाबदारी" पॅनल
चे खालील उमेदवार निवडून देऊन त्यांना सेवेची संधी द्या
सर्व साधारण मतदारसंघ
श्री योगेश शिवाजी कोंडे
मेघमल्हार सोसायटी, बिल्डिंग क्र. ई 01
श्री अभिजीत आकाराम पाटील
मेघमल्हार सोसायटी, बिल्डिंग क्र. ई 01
श्री रमेश परसु औताडे
मेघमल्हार सोसायटी, बिल्डिंग क्र. ई 02
श्री अमोल दाजी मोरे
मेघमल्हार सोसायटी, बिल्डिंग क्र. ई 02
श्री दत्तात्रय मारुती नवघणे
मेघमल्हार सोसायटी, बिल्डिंग क्र. ई 03
श्री. भरत बन्सी पटाडे
मेघमल्हार सोसायटी, बिल्डिंग क्र. ई 03
श्री. भरत दत्तात्रय शिर्के
मेघमल्हार सोसायटी, बिल्डिंग क्र. ई 04
श्री. ज्ञानेश्वर जीवन शिरसाट
मेघमल्हार सोसायटी, बिल्डिंग क्र. ई 05
श्री. संदीप नानाभाऊ नरवडे
मेघमल्हार सोसायटी, बिल्डिंग क्र. ई 05
श्री. गणेश अरुण निकम
मेघमल्हार सोसायटी, बिल्डिंग क्र. एल 01
श्री. विनोद पांडुरंग रटाटे
मेघमल्हार सोसायटी, बिल्डिंग क्र. एल 02
श्री. पंढरीनाथ कृष्णा कदम
मेघमल्हार सोसायटी, बिल्डिंग क्र. एल 02
श्री. गौरेश एकनाथ कदम
मेघमल्हार सोसायटी, बिल्डिंग क्र. एल 04
श्री. सोमनाथ किसनराव शिंदे
मेघमल्हार सोसायटी, बिल्डिंग क्र. एल 05
श्री. तुषार केशव नाईक
मेघमल्हार सोसायटी, बिल्डिंग क्र. एल ८
श्री. सुरज आनंदा पाटील
मेघमल्हार सोसायटी, बिल्डिंग क्र. एल 10
महिला राखीव मतदार संघ
सौ. संगीता अनिल ढोकरे
मेघमल्हार सोसायटी, बिल्डिंग क्र. एल ०४
सौ. नमिता धिरज पाटील
मेघमल्हार सोसायटी, बिल्डिंग क्र. एल 0८
सौ. भारती निलेश चिकणे
मेघमल्हार सोसायटी, बिल्डिंग क्र. एल ०९
इतर मागासवर्गीय मतदार संघ
सौ. नमिता धिरज पाटील
मेघमल्हार सोसायटी, बिल्डिंग क्र. एल 0८
श्री. तुषार केशव नाईक
मेघमल्हार सोसायटी, बिल्डिंग क्र. एल ८
अनुसूचित जाती / जमाती मतदार संघ
श्री सुरज सुदाम लाटे
मेघमल्हार सोसायटी, बिल्डिंग क्र. ई ०५
श्री संतोष अशोक ढेपे
मेघमल्हार सोसायटी, बिल्डिंग क्र. एल १०
विमुक्त जाती / भटक्या जमाती / विशेष मागास प्रवर्ग
श्री. गोकुळ सोमा जाधव
मेघमल्हार सोसायटी, बिल्डिंग क्र. एल ०8
श्री. बाबासाहेब तुकाराम ढोले
मेघमल्हार सोसायटी, बिल्डिंग क्र. एल ०९
मतदान : रविवार , दि. ११ मे २०२५
मतदानाची वेळ : सकाळी ११:०० ते दुपारी ४:०० पर्यंत